म्हैसाळ वार्ताहर
म्हैसाळ योजनेपासून वंचित असणाऱ्या म्हैसाळसह पूर्व भागातील १३०० हेक्टरला बंदिस्त पाईप लाईन मधुन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या दारात पाणी पोहोचविण्याचा संकल्प मनोज बाबा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त केला असून तातडीने अशा १३ गावाचा प्रकल्प प्रस्ताव सादर करावा तो लगेच च मंजूर करू असे ठोस आश्वासन जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री ना. जयंतराव पाटील यांनी म्हैसाळ येथे जाहिर सत्कार समारंभात बोलताना दिले.
म्हैसाळ येथे मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मनोज बाबा शिंदे-म्हैसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जाहीर नागरी सत्कार समारंभ व मोहनराव शिंदे सहकारी पतसंस्थेच्या विस्तारित सभागृहाचा उद्घाटन सोहळा असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ना जयंतराव पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष अविनाश काका पाटील, माजी सरपंच सौ. मनोरमादेवी शिंदे-म्हैसाळकर, माजी सभापती खंडेराव जगताप, मार्केट कमिटी सभापती दिनकर पाटील, वसंत बापू गायकवाड, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, माजी उपसरपंच परेश बाबा शिंदे-म्हैसाळकर, माजी उपसभापती कैलाससिंग शिंदे-म्हैसाळ कर, शालिवाहन मनोज शिंदे-म्हैसाळ कर, राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोहनराव शिंदे पतसंस्थेच्या विस्तारित सभागृहाचे उद्घाटन व कोनशिलेचे अनावरण जयंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.