विटा : शिवसेनेचे खानापूर तालुकाप्रमुख पांडुरंग आनंदराव भगत यांच्यावर लोखंडी गजाने हल्ला करणारा संशयित जावेद मुबारक आत्तार (वय ४१, रा. खानापूर) यास पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ताब्यात घेतले. त्यास दुपारी विटा येथील तहसीलदारांसमोर हजर करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
खानापूर येथील जावेद आत्तार याने गुरुवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास जमिनीच्या वादातून शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग भगत यांच्यावर लोखंडी गजाने हल्ला केला होता. त्यावेळी भगत यांनी हल्लेखोराचा वार हातावर घेतल्याने मोठा अनर्थ टळला. त्यावेळी लोक जमा झाल्याने हल्लेखोर आत्तार याने घटनास्थळावरून पलायन केले होते. जखमी भगत यांच्यावर भिवघाट येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
याप्रकरणी हल्लेखोर आत्तार याच्याविरुद्ध रात्री उशिरा खानापूर दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष डोके व उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रदीप पाटील यांनी शुक्रवारी सकाळी हल्लेखोर जावेद यास त्याच्या घरातून ताब्यात घेतले. दुपारी त्यास विटा तहसीलदारांसमोर हजर करून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








