आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशाने आरोग्य विभागाची कारवाई
सांगली : गणपती पेठेतील विनापरवाना सुरू असणाऱ्या दोन दुकानगाळे महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून सील करण्यात आले आहेत. मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशाने आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे आणि पथकाने ही कारवाई केली.
गणपती पेठेत दीनानाथ नाट्यगृहासमोरील बोळामध्ये विनापरवाना दुकान गळ्यामंध्ये विजय सेवांनी यांचा कुशन व्यवसाय आणि भूषण साने यांचे कलर व्यवसाय सुरू होता. याबाबत आयुक्त सुनील पवार यांच्याकडे लोकशाही दिनामध्ये तक्रार आल्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी सदरचे विनापरवाना दुकानगाळे सील करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. यानुसार वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बारगीर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्राणिल माने, वैभव कुदळे, कर्मचारी रवी यादव, सचिन सावंत, रफिक मोमीन यांच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करीत विनापरवाना सुरू असणाऱ्या दोन गाळे सील केले आहेत. तसेच मनपाक्षेत्रात जर कोणाचे विनापरवाना व्यवसाय सुरू असतील तर त्यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाचा परवाना घ्यावा अन्यथा आशा दुकानांवर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे यांनी दिला आहे.