जत, प्रतिनिधी
सोरडी (ता.जत ) येथील जिल्हा बँकेच्या शाखेत बनावट सोने देऊन शाखेला २५ लाख ७३ हजार रुपये ची फसवणूक केल्याप्रकरणी सात कर्जदार व सराफ(व्हॅल्युशनर) अशा आठ जणांवर गुन्हा दाखल झाला होता.फसवणूक प्रकरणी शहाजी मारुती तुराई (वय ३०) (रा. राजोबावाडी ),संजय विठ्ठल सावंत (वय ४५) (व्हॅल्युशनर )यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, २६ ऑक्टोंबर २०२२ते १३एप्रिल २०२३ या कालावधीत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा सोरडी येथे सोने कर्ज खातेदार शहाजी मारुती तुराई , अस्लम अमिन मुलाणी , धोंडाप्पा भिमराम गावडे , आशाबाई आप्पासाहेब टेंगले , धनाजी भिमराव पुजारी , अंकुश सदाशिव मलमे , माय्याका भिवा गावडे यांनी व्हॅल्युशनर सावंत यांच्याशी संगनमत करून बँकेत बनावट १७ सोन्याचे जिनस ठेवुन फसवणूक केल्याचे उघड झाले होते.
तसेच बँकेचा व्हॅल्युशनर सराफ संजय विठ्ठल सावंत (रा. माडग्याळ )याने ते सोने खरे असल्याचे मुल्यांकन (व्हॅल्युएशन) लेखी स्वरुपात बँकेच्या कर्जरोख्याच्या नमुन्यामध्ये स्वतः च्या सहीशिक्याने प्रमाणीत केले होते. सदरचे जिनस बँकेस तारण म्हणून बनावट सोने गहान देऊन त्या तारणावर एकूण कर्ज रक्कम २५ लाख ७३ हजार रुपये अशी रक्कम सात कर्जदार व व्हॅल्युशनर सराफ संजय विठ्ठल सावंत यांनी संगनमत करून घेवून सोरडी बँक शाखेची फसवणुक केली आहे. यातील शहाजी तुराई व व्हॅल्युएशनर सावंत या दोघांना अटक करण्यात आले आहे त्यांना १३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करत आहेत.








