नदीकाठच्या गावांनी घेतला सुटकेचा श्वास
सांगली प्रतिनिधी
आठवड्य़ाभराच्या मुसळधारेनंतर आता धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह जिह्यातही पावसाचा जोर ओसरला आहे. पाणलोट क्षेत्रातील जोर कमी झाल्याने नद्यांची पाणीपातळीही कमी होऊ लागली असून बुधवारी सायंकाळी सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणीपातळी 23 फुटापर्यंत उतरली आहे. ही पातळी तीस फुटावर पोहोचली होती.
नद्यांची पाणीपातळी कमी होऊ लागल्याने नदीकाठच्या गावांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. दरम्यान, वारणा धरणात 30.85 टी.एम.सी. पाणीसाठा झाला असून या धरणातून 3 हजार 154 तर कोयना धरणातून 21 हजार 399 क्युसेक्स विसर्ग सुरूच आहे. अलमट्टी धरणाचा विसर्ग एक लाखाने कमी करण्यात आला असून सव्वालाख क्युसेक सुरू आहे.
वारणा धरणाची साठवण क्षमत 34.40 टी.एम.सी आहे. बुधवारी हे धरण 30.85 टी.एम.सी. भरले. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 96.54 (105.25), धोम 12.48 (13.50), कण्हेर 8.86 (10.10), वारणा 30.85 34.40), दूधगंगा 22.81 (25.40), राधानगरी 8.30 (8.36), तुळशी 3.36 (3.47), कासारी 2.65 (2.77), पाटगाव 3.50 (3.72), धोम बलकवडी 3.73 (4.08), उरमोडी 9.34 (9.97), तारळी 5.31 (5.85), अलमट्टी 110.07 (123).
विविध धरणे आणि विसर्ग पुढीलप्रमाणे
विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना – 21399, धोम – 30218, कण्हेर – 5503, वारणा – 3154, दुधगंगा – 3650, राधानगरी- 3028, तुळशी – 0, कासारी – 250, पाटगाव – 250, धोम बलकवडी – 1290, उरमोडी – 2933, तारळी – 1671 व अलमट्टी धरणातून – 1 लाख 25 हजार क्युसेक्स विसर्ग सुरु आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 14.11 (45) भिलवडी पूल 25.10 (53) आयर्विन पूल सांगली 23.8 (40) व अंकली पूल हरिपूर 30.5 (45.11). जिह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.2 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 14.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.