सांगली प्रतिनिधी
पाण्यावरून राजकारण करणार नाही. पण स्वर्गिय आर.आर. पाटील यांचा इतिहास बाहेर काढण्याची भाषा करत असाल तर मीपण तुमचा इतिहास बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सडेतोड प्रत्युत्तर रोहीत पाटील यांनी संजयकाका पाटील यांना दिले आहे. तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यातील गावांना टेंभू योजनेतून सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी दिवंगत आर.आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. यावेळी व्यासपीठावरून रोहीत पाटील यांनी संजयकाकांवर निशाणा साधला.
टेंभू पाणी योजनेवरून सांगली जिल्ह्यातील राजकारण चांगलच पेटले आहे. तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यातील गावांना टेंभू योजनेतून सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांनी बोमुदत उपोषण सुरु केले आहे.
सुमनताईंच्या या उपोषणावर टिका करताना भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी नौटंकी असे संबोधले होते. तसेच या योजनेला मान्यता मिळणारच असल्याने पुत्राचे भवितव्य अंधकारमय बनल्याने काळजीपोटी मातेचे उपोषण केले असल्याची म्हणुन उपोषण म्हणजे 45 वर्षाच्या नाकर्तेपणाची कबुली असल्याची टीका केली होती. तसेच पाटील यांच्या कुटुंबियांचा राजकिय इतिहास जनतेसमोर आणण्याचेही त्यांनी सुतोवाच केले होते.
संजयकाका पाटील यांच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर देताना आर. आर. पाटील यांचे चिरंजिव रोहीत पाटील यांनी जोरदार टिका केली आहे. ते म्हणाले, “पाण्यावरून राजकारण करणार नाही, असं मी ठरवलेले आहे. टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुधारित प्रस्तावास मान्यता मिळेल त्या दिवशीच मी विरोधकांना उत्तर देईन. स्व.आर.आर.पाटील यांचा इतिहास बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांनी हे लक्षात घ्या कि मीही तुमचा इतिहास बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.” असे आव्हान त्यांनी विद्यमान खासदारांना दिले आहे.