मणेराजूरी / वार्ताहर
दुष्काळ जाहीर करा, चारा छावण्या सुरू करा, कर्जमाफी करा, बोगस लावलेली पीकपाणी नोंदी रद्द् करा, अशा विविध मागण्यासाठी मणेराजूरी (ता . तासगांव ) बसस्थानक चौकात राष्ट्रवादी कॉग्रेस व ग्रामस्थासह; शेतकऱ्यांनी गुरुवारी गांव कडकडीत बंद ठेवून सकाळी नऊ वाजलेपासून रास्ता रोको सुरु केला. यावेळी बैलगाडी बैलासह रस्त्यावर आणून शासनाचा निषेध व्यक्त केला; यामुळे गुहाघर- विजापूर हा राज्य मार्ग अडीचतास ठप्प झाला. तासगाव- कवठेमहांकाळ राज्यमार्गावर आंदोलन सुरू असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
तहसीलदार रविंद्र रांजणे यांनी शासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले. आमदार सुमनताईपाटील. यांच्यासह जि.प. सदस्य सतीश पवार, खंडू पवार, दामू पवार, अरुण पवार, हणमंत देसाई आदीनी शासनाला निवेदन दिले.
या रास्ता रोखोमुळे शाळेला जाणारी विदयार्थी, कामानिमित्त जाणारे ग्रामस्थ, प्रवासी शाळकरी मुले या रास्ता रोकोमुळे अडकून पडली. यावेळी शासनाचा निषेध करत लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा, चारा छावण्या सुरू कराव्यात ‘संपूर्ण कर्जमाफी करावे’ अशा विविध मागण्या घेऊन राष्ट्रवादीचे पदाधिकारी रस्त्यावर ठिय्या मारून बसली होती. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या विभागाच्या मंडलाधिकारी राजश्री सानप व तलाठी पांढरे यांनी आंदोलनकर्तेच्या भावना तहसीलदारांना कळविल्या . यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात यावा जनावरांना साठी चारा छावणी चालू करा.शेतकऱ्यांची वीज बिले माफ करा व पाणी पट्टी माफ करा. कर्जमाफी करा अश्या मागण्याच्या घोषणा देवून शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी जि.प. सदस्य सतीश पवार, बाजार समितीचे संचालक खंडू पवार, पंचायत समितीचे संजय जमदाडे, युवा नेते दामू पवार, अरूण पवार, दादासो पवार, विठ्ठल पवार, सचिन जमदाडे, बबन जमदाडे, सदाशिव कलढोणे, अमोल वाघमारे, विजय जमदाडे, रोहीत कलढोणे, विलास जमदाडे, सोसायटीचे चेअरमन बाळासो जमदाडे, बबन लांडगे अशोक पवार, बंडू म्हेत्रे, गणी पठाण, उदय हिंगमिरे, सोनू पवार, आदी युवक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.