देवराष्ट्रे वार्ताहर
ताकारी उपसा सिंचन योजनेच्या कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे रविवार दि. 29 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक अनेक वर्षांनी होत असुन या बैठकीस पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील उपस्थितीत राहणार आहेत.
यावर्षी प्रर्जन्यमान कमी असल्याने योजनेच्या कार्यक्षेत्रात टंचाई सदृश परिस्थिती आहे. धरणातील यावर्षीचा पाणीसाठा, योजनेला ऊपलब्ध होणारे पाणी, आवर्तनांचे नियोजन आदीसह अन्य विषयावर यावेळी चर्चा होणार आहे. योजनेवर हजारो हेक्टर क्षेत्र अवलंबून असल्याने या बैठकीला महत्व प्राप्त होत असुन योजनेच्या कार्यक्षेत्रातील आमदार, लोकप्रतिनिधी, योजनेचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.








