सांगली/प्रतिनिधी
जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका स्वाभिमानी स्वबळावर लढवणार आहे अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.
यावेळी खराडे म्हणाले गेल्या पाच वर्षा पासून शेतकरी व सर्व सामान्य माणसाच्या प्रश्नावर संघटना रस्त्यावर उतरून काम करत आहे.
आम्ही आंदोलन मोर्चा काढून शेतकऱ्यांना पैसे मिळवून दिले. आता आम्ही जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. तरी जिल्हातील सर्वच स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी करावी असे त्यांनी यावेळी सांगि.