सांगली : प्रतिनिधी
दोन दिवसाच्या उघडीप नंतर कालपासून पाऊसाने पुन्हा जोर धरल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या चोविस तासात सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 18.7 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 64.4 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 9.2 (119), जत 11.9 (118.3), खानापूर-विटा 14.2 (115.6), वाळवा-इस्लामपूर 21.9 (134.8), तासगाव 11.9 (103.7), शिराळा 64.4 (351.8), आटपाडी 10 (87.6), कवठेमहांकाळ 19.5 (118.1), पलूस 12.4 (83.9), कडेगाव 15.5 (104).