जत, प्रतिनिधी
जत तालुक्यामध्ये पुरेसा पाऊन न झाल्याने दुष्काळ सदृष्य परिस्थीती आहे. देवनाळ कॅनॉलमध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी सोडावे यासह विविध मागण्यांसाठी जत उमराणी रस्त्यावर देवनाळ फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला.
या परिसरातील देवनाळ, मेढेंगिरी, खोजानवाडी, उंटवाडी या परिसरातील तलाव व बंधारे कोरडे पडलेले आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असून . जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. खरीप हंगाम वाया गेला असून पाण्याअभावी बागायत शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे देवनाळ कॅनेलमधून म्हैसाळचे पाणी सोडून दिलासा द्यावा. चारा छावणी / चारा डेपो अथवा शेतकन्यांना थेट अनुदान मिळावे, जत तालुका दुष्काळी तालुका जाहीर करावा, या प्रमुख करण्यात आल्या.
या आंदोलनास माजी आमदार विलासराव जगताप, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सजीव सावंत यांनी पाठिंबा दिला. यावेळी बंटी दुधाळ, आप्पा दुधाळ, शिवाजी पडळकर, संजय कांबळे (देवनाळकर), सागर शिनगारे, रमेश बिरादार, प्रभाकर भाऊ जाधव, सरपंच रामकृष्ण शेलार, माजी नगरसेवक निलेश बामणे, जत शहर भाजपाध्यक्ष अण्णा भिसे, सरपंच यशोदा काराजगी, उपसरपंच ज्ञानेश्वर करोली, सदाशिव जाधव, विठ्ठल दुधाळ, राजू कुंभार, आबासाहेब कांबळे, माजी सरपंच बसवराज चेंडी, उंटवाडी सरपंच खंडू खडतरे, माजी सरपंच राजाराम साळुंखे, महादेव हूचगोंड गुंडू पवार, अमृतवाडीचे विठ्ठल पवार ,दर्याप्पा कुंभार यांच्यासह चार गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








