कुंडल/प्रतिनिधी
क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याला वसंतदादा साखर संस्था पुणे यांचा दिला जाणारा सर्वोच्च असा राज्य पातळीवरील स्व.वसंतदादा पाटील सर्वोक्तृष्ट सहकारी साखर कारखाना आणि राज्यातील सर्वोत्कॄष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार” हे दोन पुरस्कार खासदार शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते आमदार अरुण लाड आणि संचालक मंडळाने स्वीकारला. यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम, राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आमदार बबनदादा शिंदे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
तसेच कारखान्याचे पर्यावरण व्यवस्थापक सागर बंडोपंत पाटील यांना सन 2020-21 चा राज्यातील उत्कॄष्ट पर्यावरण अधिकारी या पुरस्कारानेही गौरविण्यात आले.