आटपाडी, कडेगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस, जनजीवन ठप्प
सांगली : जिल्ह्यात सलग दहाव्या दिवशीही अवकाळी पावसाची संततधार सुरूच आहे. आटपाडी आणि कडेगाव तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. तर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 11 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात एकूण 174.2 मिमी पाऊस झाला.
संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीची कामे ठप्प झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामाची पेरणी खोळंबणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. गेल्या दहा दिवसांत राज्यात संततधार पाऊस सुरू आहे. आता मान्सूनचे बारा दिवस आधीच आगमन झाले आहे. त्यामुळे दहा दिवसांपासून सुरू असलेला पाऊस कायम सुरु राहणार आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या खोळंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दहा दिवसांत 174.4 मिमी पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत 174.2 मिमी पाऊस झाला आहे. शिराळा, कडेगाव, तासगाव तालुक्यात सर्वाधिक 200 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभरात सरासरी 11 मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये आटपाडी तालुक्यात 24.6 तर कडेगाव तालुक्यात 28 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान पाणलोट क्षेत्रासह नद्यांच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने कृष्णानदीची पाणीपातळी 12 फुटापर्यंत पोहोचली आहे. सांगली तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तालुकानिहाय पडलेला पाऊस
- मिरज………………………..5.5…………………………. 162.3……………………………… 9
- जत…………………………..4.6…………………………. 124.7…………………………….. 9
- खानापूर…………………….23.8……………………….. 200.3……………………………..10
- वाळवा……………………….7.1…………………………. 211.6………………………………10
- तासगाव…………………….13.8………………………… 135.7……………………………….8
- शिराळा……………………..6.5…………………………. 224.0………………………………8
- आटपाडी……………………24.6………………………. 164.8……………………………… 9
- क.म………………………….11.1………………………… 154.9……………………………….8
- पलूस…………………………7.7………………………… 139.4……………………………….8
- कडेगाव……………………..28………………………….. 223.7…………………………….11
- एकूण………………………..11…………………………… 174.2…………………………….10








