मिरज : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. काल मनोज जरांगे-पाटील यांचे समर्थनात मिरजेत कँडल मार्च काढून सरकारचा निषेध नोंदवला. जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असा इशारा मराठा समाजाने दिला.
मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. डॉ.सुरेश खाडे हे मिरजेकडे येत असताना मराठा आंदोलकानी त्यांचा ताफा अडवला व काळे झेंडे दाखवले. एक मराठा लाख मराठा अशा घोषण देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.
जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्र्यांना रस्त्यावर फिरकू देणार नाही असा इशारा दिला. यावेळी मंत्री सुरेश खाडे हे खाली उतरुन आंदोलकांसोबत चर्चा केली तरी देखील मराठा आंदोलक यांनी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार नाही असा पवित्रा घेत पालकमंत्री यांना पिटाळून लावले. जोरजोरात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला.
शासनाकडे भावना पोहचवू आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे आरक्षणाबाबतचा निर्णय तात्काळ घ्यावा.अशी मागणी मंत्रीमंडळाच्या बैठकीत करु.आशी हमी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी यावेळी दिली. आंदोलनाचे नेतृत्व विलासराव देसाई यांनी केले. यावेळी विजय धुमाळ संतोष माने धनंजय हलकर प्रशांत चव्हाण राजू चव्हाण विक्रम पाटील तानाजी भोसले अक्षय मिसाळ दिगंबर जाधव विजय शिंदे शितल कदम हे आंदोलनात सहभागी होते.








