१३ सदस्यांना नारळ
विशेष प्रतिनिधी / सांगली
राज्यात झालेल्या सत्तांतराची दखल घेत नियोजन विभागाने राज्यातील जिल्हा नियोजन मंडळाच्या वार्षिक योजनेअंतर्गत जुन्या पालकमंत्र्यांनी मंजुरी दिलेल्या सर्व कामांना स्थगिती दिली आहे. सांगली जिल्ह्यात अशी कामे ठप्प होण्याबरोबरच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अकरा निमंत्रित व दोन तज्ञ अशा १३ सदस्यांना निरोपाचा नारळ मिळणार आहे.
राज्यात सत्तांतर होऊन भाजप आणि शिवसेनेतील शिंदे गटाची सत्ता आल्याचा पहिला दणका जिल्हा नियोजन मंडळांना बसला आहे. सोमवार दि. 4 जुलै रोजी राज्याच्या नियोजन विभागाचे उपसचिव सं. ह. धुरी यांनी एक परिपत्रक काढून यापूर्वीच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रशासकीय मान्यता दिलेल्या सर्व कामांना स्थगिती देण्याचा आदेश दिला आहे. या परिपत्रकामध्ये भविष्यात येणाऱ्या पालकमंत्र्यांसमोर या मंजूर कामांची सूची ठेवली जातील. ती कामे करायची की रद्द करायची याबाबतचा निर्णय समितीचे अध्यक्ष म्हणून नव्या सरकारच्या पालकमंत्र्यांना घ्यावा लागणार आहे. १ एप्रिल २०२२ पासून मंजुरी मिळालेल्या सर्व कामांचा यामध्ये समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार,ज्या कामांच्या वर्क ऑर्डर निघालेल्या आहेत तेवढीच कामे स्थगित होणार नाहीत. उर्वरित सर्व कामांचा निर्णय नवे पालकमंत्री घेतील.
या निर्णयाबरोबरच सांगली जिल्हा नियोजन मंडळातील पालकमंत्री नियुक्त दोन तज्ञ सदस्यांसह एकूण 13 जणांना निरोपाचा नारळ मिळणार आहे. यापूर्वी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सदस्य निवडले होते. त्यात सर्वाधिक सदस्य राष्ट्रवादीचे होते. सत्तांतरानंतर येणारे नवे पालकमंत्री भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाशी संलग्न कोणत्या सदस्यांना नियुक्ती देणार याबाबत आता उत्सुकता लागून राहणार आहे.

जिल्हा परिषदेचे सदस्य बरखास्त?
ज्या जिल्हा परिषदेच्या आणि महापालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि ज्यांचा कार्यकाल संपून प्रशासक नेमले आहेत तिथले सदस्य सुद्धा बरखास्त होणार असून त्याबाबत एक दोन दिवसात स्थानिक पातळीवरच आदेश निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेतून निवडलेल्या सदस्यांनाही निरोपाचा नारळ मिळणार आहे.