सांगली प्रतिनिधी
‘ तरुण भारत संवाद ‘ चे ज्येष्ठ छायाचित्रकार मोहन गजानन धामणीकर ( वय ६७ ) रा. एसटी स्टँड समोर शाहू उद्यानाजवळ सांगली यांचे गुरुवारी सकाळी हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , दोन भाऊ , बहिणी , पुतणे असा मोठा परिवार आहे.
वडील स्व. गजानन तथा नाना धामणीकर यांचा वारसा घेऊन गेल्या अनेक वर्ष पासून ते छायाचित्रकार म्हणून कार्यरत होते. अतिशय मन मिळावू स्वभावाच्या मोहन धामणीकर यांनी सांगलीमध्ये आलेल्या महापुरासह कोरोना काळात तसेच विविध बातम्यांच्या निमित्ताने जिल्हाभर फिरून त्यांनी छायाचित्रण केले. त्याच्या निधना बद्दल ‘ तरुण भारत संवाद ‘ परिवारासह सांगली मधील विविध राजकीय पक्ष संघटना पदाधिकारी आणि छायाचित्रकार यांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. अंत्यविधी शुक्रवारी २० रोजी सकाळी ८ वाजता सांगली मधील अमरधाम स्मशानभूमी येथे होणार आहे.








