जुना वाद आणि शिविगाळ केल्याचा रागातून कृत्य
सांगली प्रतिनिधी
जुन्या वादातून आणि शिविगाळ केल्याच्या रागातून एकाचा दगडाने ठेचून केल्याची घटना घडली आहे. विश्रामबाग हद्दीतील दत्तनगर येथे हा प्रकार घडला आहे. दिलीप शिरगूरकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या खून प्रकरणी धनराज राऊत याला अवघ्या सात तासात अटक केली आहे.
याबाबत विश्रामबाग पोलिसांच्याकडून मिळालेली माहीती याप्रमाणे, विश्रामबाग येथील 80 फुटी रोड येथील दत्तनगर मधील एका मोकळ्या जागेत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत माहिती मिळाल्यावर घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पंचनामा केला असता, डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. सदर व्यक्तीचे नाव दिलीप शिरगूरकर, वय 41 असं कळले.
त्यानुसार तपास सुरू करण्यात आला.
ज्यामध्ये दिलीप शिरगुरकर आणि संजय राऊत हे दोघे जण रात्री दारू पिण्यासाठी एकत्र बसले होते, अशी माहिती मिळाली त्यानंतर संजय राऊत याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, जुन्या वादातून आणि शिविगाळ केल्याच्या रागातून ही हत्या केल्याचा कबुली दिली त्यानंतर संजय राऊत,वय 26 याला अटक करण्यात आली आहे.








