जत प्रतिनिधी
जत- वळसंग रस्त्यावर जतपासून सहा कि.मी.अंतरावर पिक अप जीप व मोटरसायकल स्वार यांच्यात समोरासमोर धडक होऊन मोटरसायकलस्वार बबन लकाप्पा कोळी (वय ५२ रा.खलाटी) हा डोक्याला मार लागल्याने जागीच ठार झाले. ही घटना गुरुवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली.
मोटरसायकलस्वार बबन लकाप्पा कोळी हे उमदीस कार्यक्रमासाठी गेले होते. उमदीहुन ते खलाटी गावी जतकडे येत असताना जत- वळसंग रस्त्यावर पंट्रोल पंप लगत ७:३० च्या सुमारास पीक अप जीप ने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाले. रात्री ९ वाजता त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जतच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. रात्री उशिरा जत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.








