आळते वार्ताहर
विटा-तासगाव मार्गावरील महादेव मळा पानमाळेवाडी येथे मोटरसायकल चालवणाऱ्या पाडळी ता. तासगाव येथील चैतन्य बाळासो पाटील (वय २१) या युवकाच्या दोनचाकी वाहनाची चैन तुटल्यामुळे वाहनावरील ताबा सुटला व अपघात झाला. तीस ते चाळीस मीटर अंतरावर त्याचे डोके घासत गेले.या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाडळी ता.तासगाव येथील चैतन्य बाळासो पाटील (वय २१) हा युवक कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे गलाई व्यावसाय करत होता. आठ दिवसांपूर्वी तो मामांच्या वर्षश्राद्धसाठी गावी आला होता. चैतन्य रात्री उशिरा कामानिमित्त विटाहून- तासगावकडे जात असताना महादेव मळा पानमाळेवाडी येथे दुचाकीची चैन तुटल्यामुळे वाहनावरील ताबा सुटला व अपघात झाला. तीस ते चाळीस मीटर अंतरावर त्याचे डोके घासत गेले. डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. चैतन्यचा असा अपघाती मृत्यू झाल्याने पाडळी परिसरात शोककळा पसरली. या घटनेची तासगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.








