सांगली: महापालिकेतील सत्ताधारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घुसफूस वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नगरसेवकांनी स्वबळाची भाषा केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसची तयारी असेल तर आम्हीही स्वबळावर निवडणूक लढू असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे गटनेते काँग्रेसनेही स्वबळाचा सूर आवळण्यास सुरूवात केली आहे.महापालिकेची निवडणुकीची स्वबळावर लढण्याची मागणी प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे.
मैनुद्दीन बागवान यांनी कॉंग्रेसच्या नगरसेवकांना दिले आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होती. दीड वर्षापूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महापालिकेतील भाजपच्या सत्तेला सुरूंग लागला. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत महापालिकेची सत्ता काबीज केली. संख्याबळ कमी असतानाही राष्ट्रवादीला महापौरपद मिळाले. तर काँग्रेसला उपमहापौर पदावर समाधान मानावे लागले. मात्र महापालिकेची सत्ता हातात येताच राष्ट्रवादीने रंग दाखविण्यास सुरूवात केली.
हेही वाचा- गुंठेवारीत 40 लाखांचे मुरमीकरण; स्थायीत शिक्का मुहूर्त होणार
गेल्या दीडवर्षात अनेक चादग्रस्त विषय मंजूर करण्यात आले. ‘काँग्रेसचा विरोध जुमानला नाही. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांच्यामध्ये राष्ट्रवादीबाबत असंतोष निर्माण झाला आहे.कदम यांच्यासोबत झालेल्या सोमवारी माजी मंत्री विश्वजित नगरसेवकांच्या बैठकीतही हा मुद्दा गाजला. त्यातच महापौर बदलाची मागणीही करण्यात आली. यावर राष्ट्रवादीचे गटनेते बागवान यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने जनसंवाद यात्रा काढली होती.ही यात्रा सांगलीत आली तेव्हा कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला होता. काँग्रेस स्वबळावर लढणार असेल त राष्ट्रवादीचीही तयारी आहे. महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचा दावाही त्यांनी केला. महापौर बदलाबाबत काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांत काय चर्चा झाली, याची माहित नाही. त्यामुळे त्यावर बोलणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Previous Articleरेल्वे फाटकात, बेळगावकरांचा जीव धोक्यात!
Next Article येडूर परिसरातील जनतेची बिबटय़ाने उडविली झोप








