आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने बहुतांश शिक्षकांनी सामूहिक किरकोळ रजा आंदोलन केले. प्राथमिक शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करावीत, अशी मागणी करत तहसीलदार बी.एस.माने यांना निवेदन देण्यात आले.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष यु.टी.जाधव, प्रकाश विभुते तालुकाध्यक्ष संजय कबीर, श्रीकांत कुंभार, नानासाहेब झुरे, सचिन देठे, हैबतराव पावणे, दीपक कुंभार, भास्करराव डिगोळे, अधिकराव खांडेकर, दिनेश माने, बाळसाहेब साळुंखे यांच्या आवाहनानुसार शिक्षकांनी सामुहिक रजा आंदोलन केले. 01 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या व नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशैक्षणिक कामे बंद करावीत, ऑनलाइन-ऑफलाइन माहित्यांचा ससेमिरा बंद करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
शिक्षकांना फक्त शिकवू द्या, अशी मागणी शिक्षक समितीतर्फे राज्य शासनाकडे करण्यात आला. याप्रसंगी अमोल पाटील, सुभाष सुतार, रविंद्र सावंत, इन्ताब इनामदार, लालकृष्ण लांडगे, गणेश मोटे, सत्यजित भांबुरे, सतीश मदने, दत्तात्रय साठे, बापूसाहेब औंधकर, सर्जेराव पुजारी, संतोष पिसे, सतीश पुसावळे, भीमराव शिंदे, अमोल म्हमाणे, अनिता जाधव यांच्यासह शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.








