पाटबंधारे विभागाची माहिती
सांगली/प्रतिनिधी
कोयना वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतीपर्जन्यवृष्टी होत असल्याने शुक्रवारी सकाळी १० वाजले पासुन कोयना धरणाचे वक्रदरवाजे १ फुट ६ इंच उघडून ८००० क्युसेक्स विसर्ग व धरण पायथा विद्युत गृहामधून २१०० क्युसेक्स विसर्ग असा एकुण १०१०० क्युसेस्क विसर्ग सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे सांगलीत आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी ३५ फुटावर पोहोचेल असे पाटबंधारे विभागाने कळविले आहे.
याबाबत कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आज शुक्रवारी सकाळी ११ वा. कृष्णा नदीची आर्यविन पूल येथे पाणी पातळी २९.०३ फूट इतकी आहे. तसेच धरणांमध्ये पाणीसाठा व विसर्ग चालु आहे.
धरणांमधील विसर्गामुळे व मुक्त पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे कृष्णा नदीची आर्यविन पूल येथील पाणी पातळी अंदाजे ३५ फुटापर्यंत पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामूळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. वेळोवेळी अद्यावत माहितीचे निवेदन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्रमांक०२३३-२३०१८२०, २३०२९२५ या वर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.