प्रतिनिधी / मिरज
म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरणी रात्री उशिरा आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्यामध्ये मिरज, म्हैसाळ, वड्डी आणि विजयनगर येथील काहींचा समावेश आहे. पोलिसांना मिळालेल्या दोन चिठ्ठीतून काहींची नावे निष्पन्न झाल्याचे समजते. दरम्यान ताब्यात घेतलेल्यांमध्ये काही खासगी सावकारांचा समावेश असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
अधिक वाचा- सांगली जिल्हा हादरला; कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या
हेही वाचा– गुप्तधनाच्या अमिषापोटी आत्महत्या केल्याचा संशय
म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून सामूहिक आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन चिठ्ठ्या हस्तगत केल्या आहेत. या चिठ्ठ्यामध्ये काहींची नावे व त्यापुढे संखिकी आकडेवारी असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मिळालेल्या चिठ्ठीत नमूद असलेल्या नावांच्या व्यक्तींना रात्री उशिरा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये काही खासगी सावकारांचा समावेश असून, यामुळे म्हैसाळ सामूहिक आत्महत्या ही खासगी सावकारीतून झाल्याच्या संशयाला बळ मिळाले आहे. त्यामुळे म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरण वेगळे वळण घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.