सांगली प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आपल्या मतदारसंघात दाखल झाले आहेत. आज त्यांनी मतदारसंघातील प्रश्नांच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे आपल्या घरी परतले. आपल्या मतदरसंघात जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्याचा आढवा घेतला. ते गेले पंधरा दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होते.
आमदार अनिल बाबर यांनी सांगली जिल्हाधिकार्यालयात येऊन मतदारसंघातील प्रश्नांच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी माध्यमाशी बोलताना “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील स्थापन झालेलं हे सरकार लोकाभिमुख आहे” अशी प्रतिक्रिया दिली. जिल्ह्याला मंत्रिपद मिळणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, “या गोष्टी ठरवणे हे आपल्या हातात नाही, मात्र जिल्ह्याच्या नशिबात मंत्रिपद असेल तर मंत्रिपद मिळून जाईल” अशी आमदार बाबर यांनी व्यक्त केली.








