महापालिका आणि पशुसंवर्धन विभागाकडून मोहीम
सांगली : महापालिका आणि पशुसंवर्धन विभागाकडून मनपाक्षेत्रातील गो शाळा आणि अन्य गायीचे लम्पि प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा क्षेत्रात आत्तापर्यंत 450 हुन अधिक गायीचे लसीकरण करण्यात आले आहे.
लम्पिचा संसर्ग वाढू नये आणि वेळीच खबरदारी घेता यावी यासाठी मनपा आयुक्त सुनील पवार यांनी आरोग्य विभागाला मनपा क्षेत्रातील गायीचे वास्तव्य असणारी ठिकाणे, पंजारपोळ तसेच गो शाळा यामधील जनावरांना लम्पि प्रतिबंधक लसीकरण करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेचे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे डॉ. शंकर कांबळे, सत्यजित शिंदे यांच्या टीमने मनपाक्षेत्रात ठिकठिकाणी गायीचे वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी जाऊन गायीचे लसीकरण केले आहे. आतापर्यंत 450 हुन अधिक गायींचे लसीकरण करण्यात आले आहे . गुरुवारी महापालिका आणि पशुसंवर्धन विभागाकडून टिळक चौक येथील गायीचे लसीकरण करण्यात आले. यावेळी स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, वैभव कुदळे, धनंजय कांबळे, किशोर कांबळे, पंकज गोंधळे यांच्यासह मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.