Sangli LCB team arrested Ambergris and the suspected accused from Malvan
अम्बरग्रिस (व्हेलची उलटी) तस्करी सांगली एलसीबीच्या पथकाने शनिवारी मालवण येथून निलेश रेवंडकर रा. तळाशील याला ताब्यात घेतले. तसेच मालवण पोलिसांनी निलेश याच्याकडून जप्त केलेले १८ किलो अम्बरग्रिसही सांगली पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे.
सांगली येथे अम्बरग्रिसच्या (व्हेलची उलटी) तस्करी प्रकरणात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करून काही संशयितांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी कोकण किनारपट्टीवरील तळाशील मालवण कनेक्शन समोर आले आहे. आतापर्यंत या गुन्हे प्रकरणात तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, सुमारे २४ कीलोचे अम्बरग्रिस जप्त करण्यात आले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २४ कोटीं किंमत असल्याचे बोलले जात आहे.
सांगली येथील एलसीबीच्या पथकाने बुधवारी (८ फेब्रुवारी) सांगली येथील शामराव नगर परिसरात सापळा रचून तस्करी साठी आणलेली ५ किलो ६०० किलोग्रॅम वजनाची व्हेलची उलटी जप्त केली होती. गुन्हा दाखल करत सलीम गुलाब पटेल (वय ४९, रा. खणभाग, सांगली) व अकबर याकूब शेख ५१, रा. पिंगळी कुडाळ, सिंधुदुर्ग) यांना अटक केली होती.
संशयितांकडे चौकशी केली असता तस्करी साठी आणण्यात आलेली व्हेलची उलटी मालवण तळाशिल येथील निलेश रेवंडकर यांच्या जवळील असल्याचे त्यांनी सांगितले होते.
मालवण / प्रतिनिधी









