कुपवाड : कुपवाडमधील सूतगिरणीपासून एमआयडीसीकडे जाणाऱ्या जकात नाक्यापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर १५ ते २० मीटर रुंदीकरणासह बाराशे मीटर लांबीने भरणाऱ्या डांबरीकरणावर महापालिकेने तब्बल १ कोटी ८० लाख ९६ हजार रुपयांचा खर्च. केल्याचे बुधवारी मनपा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.या कामात सूतगिरणीजवळील नाल्यावरील सीडी वर्कसाठी १४ लाख रूपये आणि दुभाजक करण्यासाठी १९ लाख ५८ हजाराचा समावेश केला होता.
यापैकी सीडी वर्कसाठी तब्बल १४ लाख रुपये खर्ची दाखवले. मात्र, रस्त्याच्या डांबरीकरणात पैसे कमी पडू लागल्याचे कारण पुढे करून मनपा प्रशासनाने परस्पर प्रशासकीय पातळीवर निर्णय घेऊन दुभाजक करण्याचे काम ऐनवेळी रद्द केले आणि दुभाजकाचे १९ लाख ५८ हजार रुपये रस्त्यात वापरल्याची माहिती मनपातील अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. एकूणच मुख्य रस्त्यावर वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या दुभाजकाच्या कामाला महत्व न देता प्रशासनाने दुभाजकाचे पैसे रस्त्यात घातले, तरीही रस्ता निकृष्ट का झाला? याबाबत कुपवाडमधील सर्व सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक तसेच सामाजिक संघटना गप्प का? असा सवाल कुपवाडकरांतून व्यक्त होत आहे.
हेही वाचा- …तर राष्ट्रवादी काँग्रेसही स्वबळावर लढेल-मैनुद्दीन बागवान
कुपवाडच्या सूतगिरणीपासून जकात नाक्यापर्यंतचा रस्ता खराब झाल्याने हा रस्ता रुंदीकरण करून पूर्ण क्षमतेने डांबरीकरण करण्यासाठी कुपवाडकरांन होती. त्यानुसार माजी मुख्यमंत्री वारंवार आंदोलनाद्वारे मागणी केली देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शंभर कोटीच्या निधीतून कुपवाड रस्त्यासाठी स्वतंत्र मंजुरी मिळाली. या कामासाठी मिळालेल्या निधीतून महापालिकेने सर्व शासकीय करासहित तब्बल १ कोटी ८० लाख ९६ हजार रुपयांचा निधी खर्च केला. याच निधीतून दुभाजकासाठी १९ लाख ५८ हजार रुपये आणि सुतगिरणी जवळील नाल्यातील सीडी वर्कसाठी १४ लाख रुपये खर्च करण्याचे नियोजन ठरले होते. यामध्ये सीडी वर्कसाठी १४ लाख, एक हजार रुपये खर्च दाखवले. मात्र, ऐनवेळी रस्त्याच्या कामात पैसे कमी पडल्याचे कारण पुढे करून मनपाने दुभाजकाचे १९ लाख ५८ हजार रुपयेही रस्त्यात खर्ची घातले. त्यामुळे दुभाजकाचे काम गुंडाळल्याचे समोर आले. रस्त्यासाठी १ कोटी ८१ लाखाचा चुराडा करूनही रस्ता निकृष्ट झाला आहे.
सध्या डांबरीकरणाचे काम पूर्ण केलेल्या रस्त्यावर पहिल्याच पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी मोठमोठे आणि खोलवर खड्डे पडले आहेत. रस्त्यातील डांबर खराब झाल्याने खडीही रस्त्यावर आल्याने वाहने घसरुन पडत आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. एवढा निधी रस्त्यावर खर्च करूनही काही उपयोग नाही, अशी संतप्त प्रतीक्रिया कुपवाडकरांमधून व्यक्त होत आहे. या निकृष्ट डांबरीकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असून नगरसेवक तोंड का उघडत नाहीत? असा सवाल केला आहे.
Previous Articleयेडूर परिसरातील जनतेची बिबटय़ाने उडविली झोप
Next Article गुजरातमध्ये विषारी दारूचे 57 बळी








