विहिरीत पडून मृत्यू नाहीतर खून : इस्लामपुरात मॉर्निंग वॉक दरम्यान घटना: पत्नी पाय घसरुन पडल्याचा पतीचा कांगावा : भावाने दिली खूनाची फिर्याद : संशयीत पतीस अटक
प्रतिनिधी/इस्लामपूर
दोन मुली झाल्याचा राग मनात धरून राजनंदिनी कौस्तुभ सरनोबत ( २९ ) या विवाहितेचा तिच्या पतीनेच विहिरीत ढकलून देवून खून केल्याची घटना घडली. रविवारी मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास कापूसखेड हद्दीतील हँग ओव्हर बिअर बार जवळील विहिरीत राजनंदिनीला ढकलले. त्यानंतर पतीने आपली पत्नी पाय घसरून विहिरीत पडल्याचे पोलीसांना सांगितले. मात्र राजनंदिनी हिच्या भाऊ व नातेवाईकांनी तिचा पतीनेच खून केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी संशयीतास अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा : इस्लामपुरात विहिरीत पाय घसरून पडल्याने विवाहितेचा मृत्यू
कौस्तुभ कृष्णराव सरनोबत ( ३० ) असे संशयीत आरोपीचे नावे आहे. कौस्तुभ हा पत्नी राजनंदिनीला कापूसखेड रोडला पहाटे फिरायला मोटरसायकलवरून घेवून गेला होता. या रस्त्यावरील हँग ओव्हर बारच्या जवळ असणाऱ्या पाण्याने भरलेल्या विहिरीच्या कडेला नेवून तिला विहिरीत ढकलून दिले. तिला पोहता येत नसल्याचे त्याला माहित होते. रविवारी ही घटना घडल्यानंतर राजनंदिनी ही लघुशंकेसाठी गेली असता, विहिरीत पाय घसरून पडून तिचा मृत्यू झाला, अशी माहितीपोलीसांना कौस्तुभ याने दिली होती. मात्र मुलीचे आई-वडील व भाऊ पोलीस ठाण्यात हजर झाले. राजनंदिनी हिचा भाऊ मिलिंद नानासो सावंत-भोसले (२८,रा.कोल्हापूर) यांनी राजनंदिनीचा खून पती कौस्तुभने केल्याची वर्दी इस्लामपूर
पोलीस ठाण्यात दिली.









