मिरज : बेडग रोडवर काच कारखान्याजवळ दोन्ही ईसम गांजा विक्री करण्यासाठी येत असल्याची गोपनीय माहिती मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. त्यानुसार मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सापळा रुचून दोघांना ताब्यात घेतले आहे.
संशयित आरोपीकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता पिशवीमध्ये गांजा आढळून आला. ९६०० रुपये किमतीचा एक किलो गांजा व दुचाकी मोटरसायकलअसा एकूण ६५ हजार ८२० रुपये किमतीचा मुद्देमाल मिरज शहर पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अशोक वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक संजीव झाडे सहा.पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस हवालदार काळे, पृथ्वीराज कांबळे, पोलीस नाईक गजानन बिराजदार, नागेश मासाळ, दीपक परीट यांनी केली आहे. याप्रकरणी दोघांच्या वर गुन्हा दाखल झाला असून मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.