मिरज प्रतिनिधी
ऊस तोडीसाठी मजूर आणि ट्रॅक्टर पुरवितो, असे अमिष दाखवून कळंबी आणि भोसे येथील तिघा शेतकऱ्यांना 18 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या संबंधीत शेतकऱ्यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रारी दिल्या आहेत. त्यानुसार तिघा परप्रांतीयांसह सात जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऊसतोड मजूर पुरविण्याच्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने खळबळ उडाली आहे.
फसवणूक झालेल्यांमध्ये संजय भुपाल चौगुले (वय 58, रा. भोसे), चाँदसा मकबुल सय्यद (वय 43, रा. कळंबी) आणि बाहुबली बाबासा मालगांवे (वय 36, रा. भोसे) यांचा समावेश आहे. यापैकी संजय चौगुले यांची पाच लाख, चाँदसा सय्यद यांची साडेसात लाख आणि बाहुबली मालगांवे यांची पाच लाख, 70 हजार अशी एकूण 18 लाखांची फसवणूक झाली आहे. संजय चौगुले यांनी ऊसतोड मजूर टोळीसाठी शिवाप्पा सत्त्याप्पा हिप्परगी, आप्पासाब व्यंकाप्पा बेळगली, सिद्राय लकाप्पा मादापगोळ यांच्याशी नोटरी करार केला होता. यासाठी पहिल्या टप्प्यात चार लाख आणि दुसऱ्या टप्प्यात एक लाख अशी पाच लाख ऊपयांची रक्कम दिली होती. तर चाँदसा सय्यद या शेतकऱ्याने कालसिंग लाखनसिंग भिलालाल, धुमसिंग लाखलसिंग डुडवे व प्रेम लाखनसिंग भिलालाल यांच्याशी करार कऊन सात लाख 50 हजार ऊपये दिले होते. तसेच बाहुबली मालगांवे यांनी गोपाळ उत्तम राठोड याच्याशी करार कऊन पाच लाख, 70 हजार ऊपये दिले होते.
मात्र, गळीत हंगाम संपत आला तरी एकाही शेतकऱ्याला ऊसतोड मजूर पुरविले नाहीत. त्यामुळे संबंधीत शेतकऱ्यांनी संशयीतांकडे पैशांची परत मागणी केली. त्यातील काही शेतकऱ्यांना किरकोळ स्वऊपात रक्कम परतही देण्यात आली. मात्र उर्वरीत पैसे परत दिले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर तिघाही शेतकऱ्यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळ्या फिर्यादी दाखल कऊन संशयीत शिवाप्पा हिप्परगी, आप्पासाब बेळगली, सिद्राय मादापगोळ, कालसिंग भिलालाल, धुमसिंग डुडवे, प्रेम भिलालाल आणि गोपाळ उत्तम राठोड अशा सात जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.








