देवराष्ट्रे, वार्ताहर
Sangli Crime News : पाडळी ता.कडेगाव येथील सेवा सहकारी सोसायटीमधील अपहार प्रकरणी सोसायटीचे चेअरमन व सचिव यांच्यावर गुन्हा दाखल झाला असतानाच अन्य पिडीत सभासदांनी कडेगावचे सहाय्यक दुय्यम निबंधकांकडे आणखी तक्रारी दिल्या आहेत.
पाडळी येथील सुमन वसंत प्रताप यांच्या नावे जमिन नसताना कर्जप्रकरण करुन जामिनदारांच्या खोट्या सह्या केल्या आहेत.ही बाब समजताच जामिनदार शरद महादेव पवार व शिवाजी भाऊ चव्हाण यांनी निबंधकाकडे तक्रार दिली आहे.या कर्जप्रकरणाशी आमचा संबंध नसुन आमच्या सह्या खोट्या केल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणी सभासद शंकर चव्हाण यांनीही तक्रार दिली असुन या कर्जप्रकरणात दिड लाख रुपयांचा अपहार झाला असुन दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.