सांगली / प्रतिनिधी
बदलापूर येथे होणाऱ्या आठव्या आंबेडकरी साहित्य संमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत, समीक्षक गौतमीपुत्र कांबळे यांची निवड झाली आहे. 25 आणि 26 फेब्रुवारीला संमेलन होत आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषद हॉल कात्रप चौक येथे होणाऱ्या संमेलनाचे डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर उद्घाटक आहेत. तर ज्येष्ठ साहित्यिक बी.अनिल तथा अनिल भालेराव स्वागताध्यक्ष आहेत.
दोन दिवस होणाऱ्या संमेलनात विविध विषयांवर चर्चा आणि परिसंवाद होणार आहेत.
भारतीय संविधान : एक चिकित्सक अभ्यास, आंबेडकरी स्व-कथने : वास्तव आणि विपर्यास अशा महत्वाच्या विषयांवरील परिसंवाद, कथाकथन, नाटकाचे सादरीकरण आणि निमंतत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. रविवार, 26 फेब्रुवारीला ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होणार आहे. साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.








