पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर : विविध टोळ्यांच्या गुन्हेगारांकडे चौकशी
मिरज प्रतिनिधी
शहरात एकाच आठवड्यात दोन विरूद्ध टोळ्यांमधील कोयताधारी तरूणांच्या गँगने धुमाकूळ घातल्यानंतर पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळींपैकी काही संशयितांची धरपकड कऊन पोलिसांनी चौकशी केली. शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अशा सराईतांना पोलिसांनी चांगलाच ‘डोस’ भरला. कोयता गँगच्या दहशतीमुळे टोळीयुध्द भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन गुन्हेगारी टोळ्यांचे इतर टोळ्यांशी वैमनस्य आहे का ? याची चौकशी करण्यात आली आहे.
शहरात गेल्या दोन आठवड्यात कोयताधारी तऊणांच्या टोळीने हैदोस घातला होता. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील एका सलून दुकानात घुसून बबल्या उर्फ पृथ्वीराज शिंदे या तऊणावर कोयता हल्ला करण्यात आला. त्यानंतर चारच दिवसात विऊध्द गटाच्या टोळीने शहरातील ढेरे गल्ली, कोष्टी गल्ली परिसरात धुमाकूळ घातला. हल्ला केल्याचा वचपा काढण्यासाठी प्रथमेश ढेरे याच्या घरावर संबंधीत तऊण चाल कऊन आले. मात्र, ज्याला मारायचे तोच तऊण सापडला नसल्याने या कोयताधारी तऊणांनी परिसरात हैदोस घालत शेजारी नागरिकांच्या घरांवर कोयता व तलवारी मारल्या. त्यानंतर एका चारचाकीसह 25 दुचाकींची तोडफोड करून दहशत माजवली. त्यामुळे पुण्या-मुंबईप्रमाणे मिरजेतही कोयता गँगची दशहत निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
पूर्व वैमनस्यातून गुन्हेगारी व नशेखोरांच्या टोळ्यांमध्ये भडका उडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी कठोर कारवाईचा पवित्रा घेतला. त्यांनी शहरात वाढलेली गुन्हेगारांची दहशत मोडीत काढण्यासाठी विविध पोलीस पथकांना पाचारण कऊन सराईत गुन्हेगारांची धरपकड केली. रात्री दहानंतर रस्त्यावर घोळका कऊन थांबणाऱ्या तऊणांना चोप दिला. रातोरात नाकाबंदी कऊन तऊणांच्या दुचाकी पकडून तपासणी केली. वारंवार हाणामाऱ्यांच्या घटनांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या तसेच एकमेकांच्या टोळींमध्ये वैमनस्य असलेल्या सराईतांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. कोयता गँगने हैदोस घालणाऱ्या टोळीमध्ये अन्य सराईतांचे कनेक्शन आहे का ? याचीही चौकशी करण्यात आली. दोन गटात वाद असतील तर परस्पर समन्वयाने वाद मिटवून घ्यावेत, अशा सुचनाही देण्यात आल्या. शहरात शांतता पाहिजे, कोणीही कोयता व हत्यारे घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्यास संबंधीतांना तडीपार अथवा हद्दपार केले जाईल, अशी तंबीही पोलिसांनी दिली.
दरम्यान, शहरात आजही गुन्हेगारी टोळ्या मोकाट आहेत. खूनप्रकरणातील काही संशयीत सुटून आल्यानंतर गुन्हेगारांच्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. अनेक हद्दपार व तडीपार झालेले गुन्हेगार आदेश डावूलन स्थळसिमेत वावरत आहेत. पोलीस कारवाई होण्याचे संकेत मिळताच हे सराईत गायब होतात. पुन्हा ते आपापल्या परिसरातच मोकाट फिरतात. गुन्हेगारी टोळ्यांमध्ये संघर्ष वाढीस लागला असून, एकमेकांचा बदला घेण्यासाठी तऊण हत्यारे घेऊन फिरताना दिसत आहेत. पोलिसांनी अशा गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून त्यांचा कायमस्वऊपी बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.
नशेखोरांच्या गुन्हेगारी टोळ्या
शहरात विशेष कऊन स्टेशन परिसर, इंदिरानगर, इदगांह माळ, ख्वॉजा वसाहतसह काही संवेदनशील भागात नशेखोरांच्या टोळ्या सक्रिय आहेत. गांजा आणि नशेच्या गोळ्यांपासून नशा करणारे हे तऊण सतत हत्यारे घेऊन फिरताना दिसतात. शहर व गांधी चौकी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या वेगवेगळ्या हाणामारींच्या घटनांमध्ये नशेखोर गुन्हेगारांचाच सहभाग स्पष्ट झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांसोबत नशेखोरांनाही चाप लावण्याची गरज आहे.