सांगली / संजय गायकवाड :
सांगलीतील प्रमुख आणि प्रचंड वर्दळीचा चौक म्हणून ओळख असणारा कॉलेज कॉर्नर चौक अनेक महिन्यापासून अंधारात आहे. यामुळे येथे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. महापालिकेच्या विद्युत विभागाकडे वारंवार मागणी करूनही चौकात पुरेशा लाईट बसविल्या जात नाहीत. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांतून नाराजी आहे. या चौकातून मनपाचे अनेक अधिकारी रोज ये जा करतात. पण त्यांचे चौकाकडे लक्ष नाही. मोकाट कुत्री आणि भटकी जनावरे यांचाही येथे त्रास कायम आहे. अंगारामुळे येथे मोठा अपघात होवून लोकांचे जीव जाण्याची महपालिकेचे अधिकारी वाट पाहत आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कॉलेज कॉर्नर चौकानजिकच्या गटारी अनेक महिन्यापासून स्वच्छ केलेल्या नाहीत. कॉलेज कॉर्नर हा सांगलीतील आकाराच्या तुलनेने सर्वात मोठा चौक म्हणून ओळखला जातो. अलीकडील काळात सांगलीतील काही चौकांचे रूंदीकरण करण्यात आले. सुशोभिकरणही झाले. यामुळे त्चौकांचे रूपडे पालटून गेले. त्यात विश्रामबाग चौक व कॉलेज कॉर्नर हे दोन प्रमुख चौक खूपच मोठे झाले आहेत.
कॉलेज कॉर्नर हा सांगलीतील अनेक रस्त्यांना जोडणारा नोक आहे. या नौकाला रतनशीनगर, उत्तर शिवाजीनगर, आपटा पोलीस चोकी, काळया खणीकडून येणारा रस्ता, माधवनगरकडून येणारा तसेन टिंबर एरिया, रेल्वे स्टेशन रोड, आमराई रोड असे अनेक रोड येऊन मिळतात. या चौकामध्येही अन्य चौकाप्रमाणेच अनेक समस्या आहेत.
या चौकातील अंधारामुळे विशेषतः छोटी वाहने आणि दुचाकीस्वारांना समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे येथे छोटेमोठे अपघात होतात. सांगली कॉलेजला ट्रैफिक सिग्नलची सोय आहे. पण येथे टाईमर नसल्याने माधवनगरकडून येणाऱ्या वाहनांना पुरेसा वेळ मिळत नाही. काही सेकंदातच पुन्हा लाल दिवा लागल्याने चार दोन वाहने गेल्यानंतर पुन्हा भली मोठी रांग लागते.
कॉलेज कॉर्नरचा आकार मोठा झाल्याने येथे खूप लांबून वाहनचालकांना सिग्नल पहावा लागतो. विशेषतः आमराईच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना त्रास होतो. शिवाय आमराई ते कॉलेज कॉर्नर हा रस्ता खूपच छोटा आहे. अरूंद रस्त्यामुळे सिग्नलन्या ठिकाणी डाव्या बाजूने रतनशीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना जाता येत नाही, येथे झाडांच्या फांद्या तोडण्याची आवश्यकता आहे.
दुसरीकडे सिटी बसेसची संख्या कमी झाल्याने कधी काळी गर्दीचा बसस्टॉ प म्हणून ओळखला जाणारा कॉलेज कॉ र्नर येथे माधवनगरच्या दिशेकडील एक बस स्टॉप केंव्हाच गायब झाला. तर माधवनगरकडे जाणाऱ्या दिशेवरील बसस्टॉपवर फळविक्रेत्यांनी
- कॉलेज कॉर्नरला प्रखर दिवे बसवा
सांगली कॉलेज कॉर्नरला प्रखर विजेचे दिवे बसविण्याची आवश्यकता आहे. सध्या येथे खूप होत आहेत. मनपाच्या आयुक्त सत्यम गांधी यांनी पाहणी करून कॉलेज कॉर्नरला पुरेशा प्रमाणात विजेचे दिवे बसविण्यासाठी निर्णय घ्यावा.
-मुन्ना कुरणे, माजी नगससेवक सांगली
अतिक्रमण केले आहे. सांगली स्टॅन्डवरून सुटणाऱ्या एसटी बसेस आता पेट्रोल पंपासमोर उभ्या राहतात. कॉलेज कॉर्नर चौकामध्ये वाहतुक पोलीस कार्यरत असतात. वाहतुकीला शिस्त लावण्याचा ते प्रयत्न करतात. पण रतनशीनगरच्या दिशेने येणारे अनेक दुचाकीस्वार चौकात वाहतुकीचे नियम तोडून कशाही गाडया पळवितात. यामुळे येथे अपघात झालेले आहेत. त्यांच्यावर वाहतूक पोलिसांचा वत्चक नाही. कॉलेज कॉर्नर येथील चौकात जो आयलैंड तयार करण्यात आला आहे. त्याची जागाही काळाच्या ओघात चुकीली भासू लागली आहे. हा आयलैंड कॉलेजच्या दिशेला आणखी मध्यभागी घ्यायला हवा. त्यामुळे वाहतुक सुलभ होवू शकते असे सांगितले जात आहे.








