दोन दिवसांची कोठडी : सेवेतून निलंबीतही होणार : पोलिसांचा अहवाल येताच प्रस्ताव
सांगली प्रतिनिधी
सव्वा लाख ऊपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या महापालिकेच्या प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पवार यांच्या घरावर छापा टाकत तपासणी केली. यामध्ये सात लाख ऊपयांची रोकडही सापडली आहे. काही महत्वाची कागदपत्रे पथकाच्या हाताला लागली आहेत. दरम्यान पोलिसांचा अहवाल येताच पवार यांच्यावर महापालिकेच्या सेवेतून निलंबनाची कारवाईही करण्यात येणार आहे. त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुऊ असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
एका कंपनीमार्फत बसा†वण्यात आलेल्या फायरफायटिंग यंत्रणेच्या कामाचा अंतिम दाखला देण्यासाठी सव्वा लाख ऊपयांची लाच स्वीकारताना महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी पवार यांना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडले होते. मंगळवारी सायंकाळी अग्निशमन विभागाच्या टिंबर एरियामधील कार्यालयामध्ये ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पवार यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनयम 1988 कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान लाचलुचपत विभागाच्या पथकाने बुधवारी सकाळी पवार याच्या घराची झडती घेतली असता त्यामध्ये 7 लाखांची रोकड आढळून आली. सापडलेली सर्व रोकड जप्त करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार पोलीस उपआ†धक्षक संदीप पाटील आा†ण त्यांच्या पथकाने सापळा रचून त्यास टिंबर एा†रया पा†रसरात असणाऱ्या अग्निशमन ा†वभागाच्या कार्यालयात रंगेहात ताब्यात घेतले होते. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने त्या कालावधीत पा†लसांच्या हाती आणखी मा†हती लागण्याची शक्यता आहे.
मनपा सेवेतून निलंबीत होणार
विजय पवार याच्या कारनाम्यामुळे महापालिकेत खळबळ माजली आहे. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याने महापालिका सेवेतून निलंबीत होणार हे निश्चित आहे. पोलिसांच्या कारवाईचा अहवाल येताच पवार यांना मनपा सेवेतून निलंबीत करण्यात येईल. त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुऊ असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.








