कोल्हापूर : प्रतिनिधी
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांगली जिल्हातील बेडग गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कमान पाडणेत आलेली होती. या प्रकरणातील गावगुंडांना तात्काळ अटक करुन त्यांचेवर कारवाई करणेत यावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कमान शासनाने त्वरीत बांधून देण्यात यावी या मागणीसाठी काढलेल्या माणगांव ते मंत्रालय लॉग मार्च मोर्चामध्ये सहभाग असणारे भिमसैनिक यांना शासना तर्फे संरक्षण मिळावी तसेच रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच या लॉंग मार्चमध्ये जीव गमावलेल्या भिमसैनिकांना ५ लाख रुपये त्यांच्या कुटूंबियांना शासना तर्फे मदत देण्यात यावी. या मागणी साठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांच्या आदेशावरुन कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा महाराष्ट्र उपाध्यक्ष टिपू भाई पटवेगार यांनी दिला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हर्षवर्धन आचार्य, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष,जावेदभाई जमादार,कामगार नेते एस. के. बापु, जिल्हा अध्यक्ष युवक आघाडीचे विशाल ढाले, कामगार आघाडी हातकणंगले तालुका अध्यक्ष प्रविण चौगुले, शिरोळ तालुका अध्यक्ष स्वप्नील कांबळे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढाले आदी पदाधिकारी उपस्थित होते.








