सांगली : आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी येथे मंदिरावरुन मुले खाली फेकायची प्रथा आजही सुरू आहे. महालिंगराया देवाच्या यात्रेत नवस फेडण्याचा श्रद्धेतून मंदिरावरुन मुलांना खाली फेकण्यात येते. खाली घोंगडीत वरुन फेकलेली मुले झेलण्यात येतात.
आटपाडीच्या मासाळवाडी येथे महालिंगराया देवाच्या दिवाळी निमित्ताने भरणारया यात्रेत कळस करणारी अंधश्रद्धा आजही कायम आहे. नवस फेडण्यासाठी मंदिरावरून मुले फेकण्याची प्रथा अजूनही पाळली जात आहे. मंदिराच्या 10 ते 15 फूट छतावरून उभ्या राहून पुजारी मुलांना खाली फेकतात. खाली घोंगड्यामध्ये वरून फेकण्यात येणाऱ्या मुलांना झेलण्यात येते. लहान मुलांचे दोन्ही पाय आणि दोन्ही हात पकडुन,मुलांना घोंगडीच्या दिशेने फेकण्यात येते. अत्यंत धोकादायक असा प्रकार सुरू आहे. अशा पद्धतीने लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा हा अघोरी प्रकार निश्चितच अंगावर शहारे उभा करणारा आहे. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या या अघोरी प्रथा कधी बंद होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








