कडेगांव / प्रतिनिधी
कडेगांव शहरातील सार्वजनिक व घरगुती गणेशाचे उत्साहात आगमन झाले झांज पथक व बॅण्ड यांच्या निनानाद आगमन झाले कडेगांव नगरीचा राजा, नगराध्यक्ष धनंजय देशमुख भैय्या यांच्या लिबर्टी मंडळाची मिरवणूक पोलिस निरीक्षक शहाणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली या मंडळाने पारंपरिक झांज पथक व बॅण्ड लावून मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत मुस्लिम तरूणांचा ही सहभाग होता.आशपाक पठाण,नगरसेवक हाजी मुक्तार पटेल,सादीक मुल्ला, मेहेरबान नासिर पटेल यांच्या सह विविध मंडळांच्या ठिकाणी मुस्लिम युवक मोठ्या प्रमाणात सहभागी होवून कडेगांव शहर हे हिन्दू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आहे हे दाखवून दिले.
तसेच शिवाजी गणेश मंडळ, नवभारत गणेश मंडळ , हनुमान गणेश मंडळ, जिद्द गणेश मंडळ, भैरवनाथ मंदिर गणेश मंडळ, श्रीराम गणेश मंडळ,विघानगर गणेश मंडळ या मोठ्या मंडळांच्या मिरवणुकीने प्रतिष्ठापना करण्यात आली.तसेत घरगुती गणेश मुर्ती व सजावट यासाठी लोकांनी शुक्रवार पेठेत मोठी गर्दी केली होती.
व्यापारी यांनी विविध प्रकारचे साहित्य ठेवण्यासाठी ठेवले होते.तसेच यावर्षी चायना मेड वस्तू मोठ्या प्रमाणात नव्हताच यासाठी व्यापारी व ग्राहक यांनी फाटा दिला तसेच इकोफ्रेंडली गणेश मुर्ती खरेदी करण्यावरही ग्राहकांचा भर होता.
विविध मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये नगराध्यक्ष धनंजय देशमुख भैय्या,या.उप नगराध्यक्ष, सभापती अमोल डांगे,अध्यक्ष विजय खाडे, प्रमोद जाधव, अजित कोळी, राजेंद्र निर्मळ , युवा नेते संतोष डांगे,अभिजित पाटील आबू, किशोर देसाई, वैभव देसाई, दत्तात्रय भोसले , वैभव धमै, आप्पासाहेब चव्हाण, अभिजित लोखंडे, हेमंत व्यास, दादासाहेब गायकवाड , नितिन शिंदे या कडेगांव शहरातील प्रमुख मंडळींनी भाग घेतला.








