डॉ. अभिजीत चौधरी यांची औरंगाबाद मनपा आयुक्त पदी नियुक्ती निवड
सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे .त्यांच्या ठिकाणी न्यू टाऊनशिप सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. चौधरी यांच्या बदलीचे आदेश बुधवारी सायंकाळी प्राप्त झाले.
अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी बदलीचे आदेश काढले आहेत. डॉ. चौधरी यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असल्याने गेल्या काही दिवसापासून त्यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. परंतु राज्य शासनाने सर्वच बदल्यांना स्थगिती दिली होती. बुधवारी सायंकाळी शासनाने राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. सांगली जिल्ह्यात आलेल्या दोन महापुरात डॉ. चौधरी यांनी केलेले काम उल्लेखनीय होते, तसेच तसेच कोरोना महामारीच्या काळात जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी केलेले नियोजन आणि आरोग्य सेवा सांगलीकरांच्या सांगलीत लक्षात राहिली आहे.