सांगली : अमेरिकेतील अटलांटा येथे खुप मोठी व मानाची समजली जाणारी क्रिकेट लिग जिंकली आहे. सांगलीच्या अंकुर माळी यांच्या शार्कस् टिमने..! कळंबी ता. मिरजचे सुपुत्र असलेल्या अंकुर माळी यांच्याकडे या टिमचे कर्णधारपद होते. अमेरिकेसारख्या परकीय देशातील अटलांटा येथे सर्वात नामांकित समजली जाणारी अटलांटा क्रिकेट लीग शार्कस् क्रिकेट टीमने जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
या लीगमध्ये १० पेक्षा जास्त देशांचे स्पर्धक सहभागी असतात आणि जवळपास १०० टीम भाग घेतात. यामधून यावर्षी शार्कस् या टीमने बाजी मारली आहे आणि अभिनंदनची बाब म्हणजे ह्या टीमचे कप्तान सांगलीचे अंकुर माळी आहेत. अटलांटा क्रिकेट लीग ही अमेरिकेतील सर्वात अवघड क्रिकेट स्पर्धा मानली जाते आणि त्यात माळी यांच्या टीमने बाजी मारल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अंकुर माळी यांचे शिक्षण बीई कॉम्प्युटर सायन्स शिवाजी युनिव्हर्सिटीत झाले आहे. ते अमेरिकेत ६.५ वर्षापासून सेटल आहेत. ते अमेरिकेतसुद्धा सांगलीची आठवण म्हणून ‘एमएच १० एएलएम’ या क्रमांकाची गाडी वापरतात. याची बातमी सर्व वृत्तपत्रातून झळकली होती. यामुळे ते चर्चेत आले होते.
आता क्रिकेट टिमचे कर्णधारपद भूषवून मानाची क्रिकेट लीग जिंकण्याचीही कामगिरी त्यांनी करुन दाखविली आहे. ही टीम मागील चार वर्षे सेमी फायनलमध्ये पोहोचत होती. प्रत्येकवेळी विजयाची हुलकावणी मिळाल्यानंतर यावर्षी मात्र सगळे रेकॉर्ड मोडत काढीत त्यांनी लीग आपल्या नावावर केली. संपूर्ण अटलांटाला ही टीम जिंकावी, असे वाटत होते. या टिममध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, वेस्ट इंडिज, पाँडिचेरी येथील खेळाडू सहभागी होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









