वसगडे/प्रतिनिधी
कृषी मूल्य आयोगाची ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीत वाढ म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे, असा आराेप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदिप राजाेबा यांनी केला आहे.
एफआरपी चा पूर्वीचा १०% रिकवरी बेस गृहीत न धरता १०.२५% बेस धरून (३०५० ÷ १०.२५ = २९७) गतवर्षी १० ℅रिकवरी २९०० रू पुढील प्रत्येक १℅ रिकवरी ला २९० रुपये होता म्हणजे चालू वर्षी गतवर्षीच्या तुलनेत (२९७-२९०=७ ) ७ रू. ही दिलेली वाढ म्हणजे एक हाथ से दे और दुसरे हातसे ले असा प्रकार आहे. रासायनिक खतांपासून मशागतीसाठी लागणारे डिझेल तसेच पाणी उपशासाठी लागणारी विज याचे भरमसाठ दर वाढवलेत. त्यांचा हिशाेब कुठच लागत नाही असं राजाेबा म्हणाले.
एका बाजूला रासायनिक खतांच्या दरात वर्षभरात दुपटीने वाढ झाल्याने उसाचा उत्पादन खर्चही वाढला आहे. त्यामुळे ही वाढ शेतकऱ्यांच्या दृष्टीने अपुरीच आहे.
आगामी हंगामासाठी उसाच्या एफआरपीत प्रतिटन १५० रुपये वाढ करून ती ३,०५० रुपये करण्याची आणि १०.२५ टक्के बेस रेट धरून पुढील प्रत्येक टक्का उताऱ्याला प्रतिटन ३०५ रुपये वाढ देण्याची शिफारस केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने केली आहे. ही शिफारस केंद्रीय अन्न मंत्रालयाने गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठविली असल्याचे समजते. ही शिफारस मंजूर झाली, तर कोल्हापूर जिल्ह्याचा सरासरी १२.५० टक्के उतारा गृहित धरला, तर ३,७३६ रुपये एफआरपी होते. त्यातून सरासरी ७२५ रुपये तोडणी-ओढणी वजा जाता निव्वळ एफआरपी ३,०११ रुपये ऊस उत्पादकांच्या पदरात पडणार आहे. गेल्यावर्षी १० टक्के उताऱ्याला २,९०० रुपये एफआरपी निश्चित केली होती. त्यात २०२०च्या तुलनेत केवळ ५० रुपये वाढ झाली होती. तर पुढील प्रत्येक टक्क्यातही केेवळ ५ रुपयांची वाढ करून ती २८५ वरून २९० केली होती. यावर्षी गतवर्षीपेक्षा १५० रुपयांची वाढ दिसत असली तरी उताऱ्याचा बेस रेट ०.२५ टक्के वाढविल्याने प्रत्यक्षातील वाढ जवळपास ९७ रुपये ५९ पैसे होते. वर्षभरात दुपटीने वाढ झाल्याने उसाचा उत्पादन खर्चही वाढला आहे. त्यामुळे ही वाढ शेतकऱ्यांच्या दृष्टीने अपुरीच असल्याचे राजाेबा म्हणाले.
मागील वर्षाच्या तुलनेत ७ रू. वाढवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केलेली आहे. उत्पादनाचा खर्चही वाढला आह. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना साखरेचा खरेदी दर ३१ वरून किमान ३६ रुपये करावा यासाठी गेली चार वर्षे मागणी करत आहे. परंतू त्याकडे केंद्र सरकार जाणीवपूर्वक काना डोळा करत असल्याचा आराेप राजाेबा यांनी केला आहे.








