मिरज प्रतिनिधी
शहरातील वंटमुरे कॉर्नर येथे रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात समोऊन आलेल्या ट्रकची जोरदार धडक बसून एका फायनान्स कंपनीचा कर्मचारी जागीच ठार झाला. बुधवारी दुपारच्या सुमारास अपघात झाला. विशाल कारे (वय 26, रा. लवली सर्कल, सांगली) असे अपघातात मयत झालेल्या तऊणाचे नांव आहे. घटनास्थळाचा पंचनामा कऊन रात्री उशिरापर्यंत महात्मा गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुऊ होते.
घटनास्थळावऊन मिळालेली माहिती अशी, विशाल कारे दुचाकीवऊन सांगली-मिरज रस्त्याने जात होते. यावेळी तो वंटमुरे कॉर्नरजवळ आला असता खड्डा चुकविण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी समोऊन भरधाव वेगात आलेल्या ट्रकची धडक बसली. या अपघातात विशाल याच्या डोक्याला गंभीर मार लागून तो जागीच ठार झाला.
अपघाताची माहिती मिळताच महात्मा गांधी चौकी पोलिसांनी घटनास्थळी धांव घेतली. जखमीला तातडीने शासकीय ऊग्णालयात दाखल करण्यात आले. तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुऊ होते. दरम्यान, मयत विशाल कारे हा सांगलीतील लवली सर्कल येथे राहण्यास होता. तो एका खासगी फायनान्स कंपनीत काम करीत होता. वसुलीसाठी त्याचा दररोज सांगली-मिरज असा दौरा असायचा. मात्र, बुधवारचा दिवस त्याच्यासाठी शेवटचा ठरला. त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. विशालच्या पश्चात आई, वडील, दोन बहिण असा परिवार आहे.