ओटवणे / प्रतिनिधी
Sangeli Primary Health Center Dr. Appointment of medical officer Omkar Kubde!
सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी पद चार वर्षांपासून रिक्त होते. या एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी अभावी या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत सांगली गावचे सरपंच लवू भिंगारे यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यामार्फत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधताच या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. ओंकार अशोकराव कुबडे या एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबडे यांचे सांगेली सरपंच लवू भिंगारे यांनी स्वागत केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, उपसरपंच संतोष नार्वेकर, ग्रामविकास अधिकारी कांता जाधव, ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम राऊळ, भिकाजी कदम, सागर सांगेलकर, गौरी राऊळ, रसिका आईर, शितल राऊळ, श्रावणी राऊळ, सुमन सांगेलकर, अंगणवाडी व आशा सेविका तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.









