ओटवणे प्रतिनिधी
सांगेली येथील माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेला बसलेले सर्व ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या शाळेतून प्रथम क्रमांक मानसी तुळशीदास मुरकर ९२.६० % (५०० पैकी ४६३ गुण), द्वितीय क्रमांक लक्षद्वी सचिन सावंत ९२.४० % (५०० पैकी ४६२ गुण), तृतीय क्रमांक दत्ताराम संतोष सावंत ८९.२० % (५०० पैकी ४४६ गुण) या विद्यार्थ्यांनी पटकाविला. तर विशेष श्रेणीत २३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत १९ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ पुनाजी राऊळ, सचिव विश्वनाथ राऊळ, प्राचार्य रामचंद्र घावरे, शिक्षक,कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.









