सुधाकर काशीद – तरुण भारत
कोल्हापुरातले केशवराव भोसले नाट्यागृह म्हणजे कोल्हापूरच्या सांस्कृतिक घडामोडीचा केंद्रबिंदू आहे .आता हा केंद्रबिंदू केवळ केशवराव नव्हे तर , संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यागृह या नावाने नव्या पिढीसमोर येणार आहे .केशवराव भोसले यांची उद्या 133 वी जयंती आहे . त्यानिमित्ताने हा नाम विस्तार करून त्यांना अनोखे वंदन केले जाणार आहे. पॅलेसथिएटर ते केशवराव भोसले नाट्यागृह व उद्यापासून संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यागृह असा त्याचा नाम प्रवास सुरु झाला .
कोल्हापूर एक कलेचे माहेरघर ,कलाकारांची खाण .त्यापैकीच एक रत्न म्हणजे केशवराव विठ्ठल पंत भोसले. ते मंगळवार पेठेत तस्ते गल्लीत राहायचे. लहानपणीच वडील विठ्ठलपंत यांचे निधन झाले. व उदरनिर्वाहासाठी त्यांची आई जनाबाई या केशवराव , व नारायण या मुलांसह स्वदेश हितचिंतक या नाट्या कंपनीत स्वयंपाकाचे काम करू लागल्या. तेथेच केशवरावांचा नाटकाशी संबंध आला.
वयाच्या पाचव्या वर्षी एक बालकलाकार म्हणून त्यांचा रंगभूमीवर प्रवेश झाला. छोट्या छोट्या भूमिका करत रंगभूमीवर त्यांचा वावर राहिला. त्यातून वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी आपली स्वत?ची ललित कलादर्श ही नाटक कंपनी स्थापन केली . या कंपनीने महाराष्ट्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली .त्या नाटकाची कंपनी एका गावाहून दुस्रया गावाला जाताना रेल्वेच्या चार-पाच बोगी बुक करायची व त्यावर फलक लावून मोठ्या दिमाखात प्रवास करायची. त्या काळात फार मोठे नाव केशवराव भोसले यांच्या ललित कलादर्श या नाटक कंपनीने मिळवले होते.
पण काही कारणास्तव त्यांचे कोल्हापुरात खूप कमी वास्तव्य राहिले .काही मुद्यावरून केशवराव भोसले यांचे शाहू महाराजांशी मतभेद झाले होते व ते कोल्हापूर बाहेरच आपली नाटके त्यामुळे सादर करत होते पण हे मतभेद मिटले . व त्यांना कोल्हापुरात पुन्हा सन्मानाने आणण्यात आले व त्यांचे मृच्छकटिक हे नाटक त्यानिमित्ताने खासबाग कुस्ती मैदानात 20 ते 22 हजार रसिकांच्या समोर सादर करण्यात आले.
केशवराव भोसले यांनी 1895 ते 1921 या काळात नाट्या रंगभूमी गाजवली. त्यांची 31 नाटके लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली. त्यांची धैर्य धराची भूमिका तर दंतकथेचा विषय ठरली . चोवीस स्त्राrभूमिकाही केल्या .केशवराव भोसले व बालगंधर्व यांनी मुंबईत संयुक्त मानापमान हे नाटक संयुक्तपणे सादर केले. हे नाटक टिळक स्मारक निधीसाठी आयोजित करण्यात आले होते .या नाटकाच्या तिकिटाचा काळाबाजार झाला इतकी गर्दी या नाटकाला होती . व तो नाट्यासृष्टीच्या इतिहासातला एक वेगळा क्षण म्हणून नोंदला गेला.
केशवराव भोसले यांनी त्यांच्या ललित कलादर्श या माध्यमातून नाट्या संस्कृतीत नवे नवे पायंडे पाडले .रंगमंचावर मखमली पडदा , वेळेवर नाटक सुरू करणे , सन्मान ,यांत्रिक घंटा, गॅस बत्तीचा प्रकाशासाठी वापर ,हँडबिलचे जागोजागी वाटप , ठिकठिकाणी मोठी पोस्टर ,ओपन एअर थिएटरचा वापर ही त्यांनी वेगवेगळी वैशिष्ट्यो आपल्या नाट्या प्रवासात जपली.
केशवराव भोसले यांच्या नाट्यासृष्टीतील या कार्याची दखल घेऊन 15 ऑगस्ट 1957 रोजी पॅलेस थिएटर
या नाट्यगृहाला त्यांचे नाव देण्याचा ठराव कोल्हापूर नगरपालिकेने केला. गेली काही वर्ष त्यांच्या नावापुढे संगीतसूर्य हे सन्मान पद लागावे यासाठी त्यांचे नातेवाईक ,नाट्याप्रेमी ,नाट्या संस्था आग्रही होते. त्याचे पणतू अशोक पाटील हे त्यासंदर्भातला पत्र व्यवहार करत होते. अखेर कोल्हापूर महापालिकेने त्यांच्या नावापुढे संगीत सूर्य हे सन्मानाचे पद लावण्याचा निर्णय घेतला. व त्यामुळे उद्यापासून केशवराव भोसले नाट्यागृह ,संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृह या नावाने ओळखले जाणार आहे .केशवराव भोसले यांचा बहुतेक सारा परिवार कोल्हापूर परिसरात आहे . शांताबाई वासुदेव शिंदे ,कमलाबाई माधवराव शिंदे या त्यांच्या मुली कोल्हापुरातच होत्या. त्यांचा फार मोठा परिवार आपले पणजोबा केशवराव भोसले यांच्या स्मृती जपण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. आणि त्याच प्रयत्नाला यश येऊन उद्या नाट्यागृहाचे नाव केशवराव ऐवजी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यागृह असे होणार आहे.









