संगमेश्वर, प्रतिनिधी
Ratnagiri Crime News : संगमेश्वर कुंभारखाणी बुद्रुक येथील शेतकऱ्याची पशुखाद्य कडबा कुटीसाठी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या संशयताला संगमेश्वर पोलिसांनी अटक केली .संशयिताचे नाव तमन्ना आनंद तिमापुर असे असून, कर्नाटकमध्ये तिला अटक केले. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिंदे आणि सचिन कामेरकर यांनी कामगिरी केली.
गेल्या वर्षी सुनैना सुभाष सुर्वे यांची अशाचपध्दतीने फसवणूक झाली होती. यंदा कुंभारखाणी बुद्रुक येथील शेतकऱ्याची फसवणुक झाली. पशुखाद्य कडबा कुटीसाठी शेतकऱ्यांने 46 हजार रुपये भरले मात्र त्याला खाद्य मिळाले नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने पोलीसांकडे धाव घेतली. यानंतर संशियितास कर्नाटक मध्ये अटक करण्यात आले.









