सावंतवाडी | प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला एका मागून एक खिंडार पडत चालले असून तालुकाप्रमुख मायकल डिसोजा आणि उपतालुकाप्रमुख बाळू माळकर , विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर. आता निरवडे येथील उपतालुकाप्रमुख संदीप पांढरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील एका पाठोपाठ एक पदाधिकारी राजीनामा देत आहेत. त्यामुळे पक्षात आता मोठे खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे.नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेले हे राजीनामा सत्र पक्षश्रेष्ठी कसे रोखणार याकडे राजकीय वर्तुळासह ,सामाजिक क्षेत्रात चर्चा सुरु आहे .









