सावंतवाडी | प्रतिनिधी
भाजप बांदा विभागाच्या ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी माजी उपसभापती संदीप नेमळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे . ओबीसी मोर्चा सेलच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग ,मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, महेश धुरी ,माजी नगरपालिका आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर आदींनी स्वागत केले. यावेळी संदीप नेमळेकर म्हणाले की ,आपण ओबीसींच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









