कणकवली /प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांची फेरनिवड करण्यात आली. ही निवड भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जाहीर केली.भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाची संदीप मेस्त्री धुरा सांभाळाताना भाजप पक्षाशी युवकांना जोडण्याचे कामे करून युवकांचे संघटन उभे केले. जनतेच्या प्रश्न व समस्यांचा भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठावून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार नारायण राणे यांना विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमदेवार नितेश राणे यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली होती. कलमठ गावाचे सरपंच व युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळतानाच त्यांनी पक्षाचा प्रत्येक कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती तळगाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पक्षाने पुन्हा त्यांच्या खाद्यांवर भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदीचा जबाबदारी सोपवली आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पुन्हा मेस्त्री यांची युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. गेली तीन वर्षे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे युवमोर्चा जिल्हाध्यक्षपद भूषविले. या दीड वर्षांच्या कार्यकालात केलेल्या उल्लेखनीय कायार्चा आढावा घेऊन पुन्हा एकदा संदीप मेस्त्री यांची २०२५ – २८ पर्यंत युवमोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यानिवडीनंतर त्यांचे पक्षाच्या नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्ह्याची भाजपची युवा संघटना सर्वांच्या मार्गदर्शन आणि युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्याने पुढे नेणार असे संदीप मेस्त्री यांनी सांगितले.









