नवी दिल्ली
देशातील गॅस उत्पादक कंपनी गेलच्या अध्यक्षपदी संदीप कुमार गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे. इंंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीत आर्थिक संचालक संदीप कुमार गुप्ता हे भारतामधील सर्वात मोठी गॅस कंपनी गेल (इंडिया) लिमिटेडचे प्रमुख म्हणून आता धुरा सांभाळणार आहेत. यामध्ये सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाने (पीइएसबी)ने दिलेल्या माहितीनुसार 10 उमेदवारांनी एकत्रितपणे नोंदवलेल्या मतानंतर गेलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदासाठी 56 वर्षांच्या गुप्ता यांची निवड केली आहे.
ते मनोज जैन यांच्या जागी विराजमान होणार आहेत. ते 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत होणार आहेत. पीईएसबीच्या शिफारशीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळात या नियुक्तीला निवड समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे गुप्ता यांचा कार्यकाळ हा फेब्रुवारी 2026 पर्यंत राहणार असल्याचेही सांगितले आहे.









